Video: सेल्फी घ्यायला गेली अन् गमावून बसली...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जगभरात मोबाईल सेल्फीच्या वेडापायी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, सेल्फीचे वेड कमी होताना दिसत नाही. परंतु, येथील सल्फीचा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली: जगभरात मोबाईल सेल्फीच्या वेडापायी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, सेल्फीचे वेड कमी होताना दिसत नाही. परंतु, येथील सल्फीचा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जीव गेला तरी चालेल पण तुला 'सोडणार' नाही...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या राहून दोन मुली मोबाईल उंच धरत सेल्फी घेत होत्या. यावेळी रस्त्यावरून वाहने धावत होती. यावेळी सेल्फी घेण्यात रमलेल्या मुलींच्या हातातला मोबाईल एक स्कूटरस्वार अलगद उचलतो आणि निघून जातो. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळलेल्या मुली आरडाओरडा करताना दिसतात. पण, स्कूटरस्वार चोर सापडतो की नाही हे या व्हिडिओतून स्पष्ट होत नाही. संबंधित व्हिडिओ फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटरसह सोशल मीडियाच्या विविध ऍपवरून व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नसून, प्रतिक्रियांच्या माध्यमातून नेटिझन्स व्यक्त होत आहे. परंतु, व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, हे समजू शकेलले नाही. पण, उत्तर भारतातील व्हिडिओ असल्याचे एका नेटिझन्सनी म्हटले आहे.

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girls selfie on road while mobile being snatched away by biker video viral