Political News : उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची निवड करा, अन्यथा..; डीकेंची निवड होताच बड्या नेत्याचा थेट इशारा

शिवकुमार यांनी हायकमांडसमोर उपमुख्यमंत्रिपदाबाबत अट ठेवली होती असे बोलले जात आहे.
Siddaramaiah and DK Shivakumar
Siddaramaiah and DK Shivakumaresakal
Summary

दलितांवर अन्याय होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. हायकमांडने (Congress High Command) तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील परमेश्वर यांनी केली.

बंगळूर : ‘कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची (Dalit leader) निवड न केल्यास प्रतिकूल प्रतिक्रिया उमटेल’ असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर (G. Parameshwara) यांनी दिला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांची (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्रिपदी डी. के. शिवकुमार यांची निवड करण्यात आल्यानंतर काही तासातच परमेश्वर यांनी हा इशारा दिला आहे.

Siddaramaiah and DK Shivakumar
Karnataka : सिद्धरामय्यांमुळंच युती सरकार कोसळलं; सत्ता स्थापन करण्यापूर्वीच दोन बड्या नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट

‘शिवकुमार यांनी हायकमांडसमोर उपमुख्यमंत्रिपदाबाबत अट ठेवली होती असे बोलले जात आहे. याबाबत परमेश्वर यांना विचारले असता ते म्हणाले, 'शिवकुमार यांच्या दृष्टीने त्यांची मागणी बरोबर असेल तरी हायकमांडचा याबाबतचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि निर्णय हायकमांडलाच घ्यायचा असल्याने दलित समाजाला पक्षाकडून अपेक्षा आहेत.'

Siddaramaiah and DK Shivakumar
Karnataka Election : विधानसभेत दिसणार 'पाटीलकी'; निवडणुकीत तब्बल 'इतक्या' पाटलांनी मिळवला विजय

दलितांवर अन्याय होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. हायकमांडने (Congress High Command) तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील परमेश्वर यांनी केली. परमेश्वर या मागणीची हायकमांड दखल घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com