भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा द्या- मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्‌द्‌यावरून संसदेत सरकारला घेरण्याची विरोधकांनी तयारी चालविली असताना, या भ्रष्टाचारविरोधातील मोहिमेला विरोधी पक्षांनी जीएसटी विधेयकाप्रमाणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे आग्रही प्रतिपादन करताना विरोधकांना यावर गांभीर्याने विचार करण्याची सूचनाही मोदींनी केली आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरवात होत आहे. त्यानिमित्त सरकारतर्फे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन केले. सरकार सर्व मुद्‌द्‌यांवर चर्चेसाठी तयार असून, अधिवेशनाचा उपयोग जनकल्याणाचे विषय मार्गी लावण्यासाठी केला जावा, असा सल्लाही मोदींनी विरोधकांना दिल्याचे, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. संसद भवनाच्या आवारात झालेल्या या बैठकीला दोन्ही सभागृहातील सर्व प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. विरोधी पक्षांकडून उपस्थित होणाऱ्या मुद्‌द्‌यांवर सरकार उत्तर देण्यासाठी तयार असल्याचेे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

गोपनीयता, गुप्तता जपली : अनंत कुमार

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाची सत्ताधारी भाजपला आणि विशिष्ट घटकांना पूर्वकल्पना दिली होती, या विरोधकांच्या आरोपाचा समाचार घेताना संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी हे आरोप तद्दन निराधार आहेत, असे प्रत्युत्तर दिले. या निर्णयात पूर्णपणे गोपनीयता आणि गुप्तता जपली, असाही दावा त्यांनी केला.

Web Title: Give support to the anti-corruption campaign