Global Investors Summit  : PM मोदी आणि मुख्यमंत्री धामी यांच्या नेतृत्वात उत्तराखंडची सर्वोच्च प्रगती झाली: अमित शहा

अटलजींनी तयार केलेल्या उत्तराखंडला सांभाळण्याचं काम पंतप्रधान करत आहेत
Global Investors Summit
Global Investors Summit esakal

Global Investors Summit  :

'अटलजींनी उत्तराखंड निर्माण केले, पंतप्रधान मोदीजींनी उत्तराखंडला अधिकच सुंदर बनवले. आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड विकसीत होत आहे. तसेच, पीएम मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडने आतापर्यंतची सर्वोच्च प्रगती केली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. उत्तराखंडमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोपावेळी ते बोलत होते.

यावेळी उत्तराखंड गुंतवणुकीसाठी 3.5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी, अमित शहा यांनी या चांगल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री धामी आणि राज्य प्रशासनाचे अभिनंदन केले.

ही ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट म्हणजे 3.5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारासह नवीन उत्तराखंडच्या अनेक शक्यता निर्माण करण्याची सुरुवात केली आहे. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास न करता. एका छोट्या राज्याला पर्यावरणपूरक पद्धतीने उद्योगाशी जोडण्याचे उदाहरण उत्तराखंडने जगासमोर ठेवले आहे, असेही शहा यावेळी म्हणाले.

Global Investors Summit
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

पुढे ते म्हणाले की, 'मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे लक्ष्य काय आहे. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

आज राज्यात गुंतवणुकीसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत, ही कौतुकाची बाब आहे. त्याबद्दल मला राज्य प्रशासनाचे अभिनंदन करायचे आहे. आता उत्तराखंड मजबूत राज्य होईल.

Global Investors Summit
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पीएम मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडने आतापर्यंतची सर्वोच्च प्रगती केली आहे. उत्तराखंडने सहा वर्षांत ३० हून अधिक धोरणे राबवून धोरणात्मक राज्याचा मान मिळवला आहे.

येथे तुम्हाला चांगले डेस्टिनेशन तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळेल जे गुंतवणुकीसाठी खूप महत्वाचे आहे. भाजप सरकारने येथील सांस्कृतिक वारसा आणि विकासाच्या समांतर नोंदी केल्या आहेत.

उत्तराखंडमधील उत्कृष्ट कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षा यामुळे गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण मिळाले आहे. या शिखर संमेलनामुळे देवभूमीच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.

Global Investors Summit
Uttarakhand: उत्तराखंडसाठी दुबईत रोडशो; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 हजार कोटींच्या बंपर गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com