Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

प्रत्येक क्षण उत्तराखंडमधील सव्वा कोटी जनतेसाठी दिल्याचे समाधान आहे, अशी भावना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीsakal

डेहराडून : मला फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळाला असला तरी या अल्प काळात ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही केली. प्रत्येक क्षण उत्तराखंडमधील सव्वा कोटी जनतेसाठी दिल्याचे समाधान आहे, अशी भावना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी व्यक्त केली. त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली. आधीचे काँग्रेस सरकार फक्त घोषणा करायचे. त्यावर कार्यवाहीचा कसलाही प्रयत्न झाला नाही, असे ते म्हणाले. (Uttarakhand Assembly Election Updates)

अनेकविध प्रश्नांची हाताळणी

राज्याची सूत्रे हाती येताच धामी यांना अनेकविध आव्हानांना सामोरे जावे लागले. चारधाम देवस्थान मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी पुजारी वर्ग आंदोलन करीत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखाही राज्याला बसला. ढिसाळ नियोजनामुळे हरिद्वारचा कुंभमेळा संसर्गाच्या उद्रेकास कारणीभूत ठरला. त्यानंतर नेतृत्वबदल होऊन धामी यांच्याकडे सूत्रे आली. तेव्हा त्यांना अशा प्रश्नांमधून धामी यांना मार्ग काढावा लागला.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

चारधामचे पुजारी निवडणूक लढविण्याच्या पवित्र्यात होते, पण धामी यांनी देवस्थान मंडळाबाबत समिती स्थापन केली. मग हे मंडळ विसर्जित करून संतप्त पुजारी वर्गाला शांत केले. मंत्रिमंडळात वयाने अनेक सहकारी ज्येष्ठ असूनही धामी यांनी प्रत्येकाला विश्वासात घेतले. केवळ हरकसिंह रावत यांचा अपवाद वगळता त्यांनी पक्षात एकी कायम ठेवली.

रावत यांच्यामुळे दुहेरी आव्हान

धामी ४६ वर्षांचे आहेत. प्रशासनाचा जेमतेम सहा महिन्यांचा अनुभव आहे. खटिमा मतदारसंघात काँग्रेसचे मातब्बर हरिश रावत यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आणणे आणि जिंकू किंवा मरू असा निर्धार केलेल्या रावत यांना सामोरे जाणे असे दुहेरी आव्हान त्यांच्यासमोर आहे. भाजपने ७० पैकी ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हरिश रावत ७३ वर्षांचे आहेत. २०१७ मध्ये त्यांनी हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा अशा दोन ठिकाणांहून ते रिंगणात उतरले, पण त्यांना कुठेच यश आले नाही. यानंतरही उत्तराखंडच्या राजकारणात सर्वाधिक लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख कायम आहे. अनेक जनमत चाचण्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. भाजपमधील गटबाजीचा फायदा होण्याची त्यांना आशा आहे. बहुमताने सत्तेवर येऊनही भाजपने पाच वर्षांत तीन जणांना मुख्यमंत्री बनविले हा मुद्दा ते आक्रमकपणे मांडतात.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी
जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा; चालक बेपत्ता

नैसर्गिक संकटांचा सामना

दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल, रेल्वे मार्गांचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाची तीव्रता काही प्रमाणात २०१३च्या केदारनाथमधील प्रलयासारखी होती, पण यावेळी धामी यांच्या नेतृत्वाखाली सरकारी यंत्रणेने तातडीने पावले टाकल्यामुळे अनेकांचे जीव वाचविता आले.

शहा यांच्याकडून प्रशंसा

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही धामी यांच्या संकटकाळातील तत्पर कार्यपद्धतीमुळे केंद्राला फार काही करण्याची गरज भासली नाही, अशी प्रशंसा केली. शहा यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर कार्यक्रमांत धामी यांना शाबासकी दिली आहे. त्यामुळे धामी पक्षाच्या अपेक्षांची पुर्तता करीत असून त्यांचे स्थान उंचावत असल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com