Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Prajwal Revanna
Prajwal Revanna

नवी दिल्ली- जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप प्रकरणी एसआयटी तपास करत आहे. एसआयटीने याप्रकरणी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्याचं दिसत आहे.

जगातील सर्व इमिग्रेशन पॉईंट्सना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कथित सेक्स टेप समोर आल्यानंतर रेवण्णा फरार झाले आहेत. ते जर्मनीत असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जेडीएसने याआधीच रेवण्णा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Prajwal Revanna
Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

प्रज्वल हे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांचे पुत्र आहेत. जेडीएस हा एनडीएचा घटकपक्ष आहे. भाजप आणि जेडीएस एकत्र निवडणूक लढवत आहेत. प्रज्वल हे जेडीएसकडून हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मतदान पार पडले आहे. मतदानानंतर त्यांनी देशातून पलायन केले आहे.

सेक्स टेप आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रज्वल अडचणीत सापडले आहेत. त्यांनी एसआयटीकडे हजर होण्यासाठी सात दिवसांचा वेळ मागितला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा बुधवारी एका सभेत म्हणाले होते की, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसोबत भाजप कधीही राहू शकत नाही. या त्यांच्या वक्तव्याचा सिद्दरामय्या यांनी समाचार घेतला.

Prajwal Revanna
Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

प्रज्वल यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे. सिद्दरामय्या म्हणाले आहेत की, 'काही व्हिडिओ समोर आले असून यात महिलांवर अत्याचार झाल्याचं दिसत आहे. यासंदर्भात ३३ व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहेत.' निवडणुकीच्या काही दिवस आधीच हे व्हिडिओ समोर आले होते. प्रज्वल यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. प्रज्वल आणि त्यांच्या वडिलांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com