Crime News : ‘गो फर्स्ट एअर'च्या हवाई सुंदरी बरोबर गैरवर्तन

विमान प्रवासात प्रवाशांनी गैरवर्तन करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आता ‘गो फर्स्ट एअर'च्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे.
Go First Airlines
Go First AirlinesSakal
Summary

विमान प्रवासात प्रवाशांनी गैरवर्तन करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आता ‘गो फर्स्ट एअर'च्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली - विमान प्रवासात प्रवाशांनी गैरवर्तन करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आता ‘गो फर्स्ट एअर'च्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली- गोवा विमानातील एका परदेशी प्रवाशाने हवाई सुंदरीबरोबर (एअर होस्टेस) गैरवर्तन केले आहे. या परदेशी प्रवाशाने एअर होस्टेसला त्याच्याजवळ (मांडीवर) बसण्यास सांगितले आणि तिच्याशी तो अश्लील भाषेत बोलला असा आरोप आहे.

गुरूवारच्या म्हणजे ५ जानेवारीच्या या घटनेबाबत याबाबत ‘सीआयएसएफ'कडे तक्रार केली आहे. विमान कंपनीने या घटनेची संपूर्ण माहिती डीजीसीएला दिली आहे. अलीकडे प्रवासी आणि एअर होस्टेस यांच्याशी गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकताच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये प्रवाशाने इंडिगोच्या एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले होते. त्या प्रकारात जेवणाच्या पर्यायावरून प्रवासी आणि इंडिगो फ्लाइट अटेंडंट यांच्यात वाद झाला होता.

यापूर्वी एअर इंडियाच्या विमानात महिला सहप्रवाशावर लघुशंका करणाऱया शंकर मिश्रा या मद्यधुंद प्रवाशाला दिल्ली पोलिसांनी आजच बेड्या ठओकल्या. त्यापाठओपाठ गो फर्स्ट कंपनीच्या विमानातील हे प्रकरण समोर आले आहे.

प्रवाशांसाठी आचारसंहिता

मुलकी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) प्रवाशांच्या वाढत्या गैरवर्तनची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली आहे. डीजीसीएने एक अॅडव्हायझरी जाहीर केली. त्यानुसार आता विमानांसाठी या नियमावलीचे पालन विमान कंपन्यांना करावे लागणार आहे. एखाद्या प्रवाशाबद्दल संशयास्पद वर्तनाची शंका आली तरी त्याची त्वरित तक्रार पुढच्या विमानतळावरील पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व विमान कंपन्यांचे वैमानिक व केबिन क्रू यांच्यासाठी हा नियम बंधनकारक असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com