Go First Airlines : विमानाला नव्हते पायलट, प्रवाशी ताटकळले; महिला आयएएस अधिकारी संतापून म्हणाल्या...

Go First Airlines News
Go First Airlines Newsesakal

नवी दिल्लीः एका महिला आयएएस अधिकाऱ्याचं ट्विट व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी दावा केलाय की, कॅप्टनच्या अनुपस्थितीमुळे विमान तब्बल दोन उशिराने उडालं. यादरम्यान विमानात अनेक प्रवाशी अडकून पडले होते. ज्यामध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश होता.

आयएएस सोनल गोयल (IAS Sonal Goel) यांनी एकानंतर एक ट्विट करुन गो फर्स्ट एअरलाईन्सवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्लाईट G8 345 मुंबई एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी रात्री साडेदहा वाजता उड्डाण करणार होतं. परंतु एका घंट्यापेक्षा जास्त उशीर झाला. प्रवाशी मात्र विमानात अडकले होते. एअरलाईन्सच्या स्टाफने कॅप्टन उपलब्ध नसल्याचं कारण देवून दुसऱ्या कॅप्टनची व्यवस्था करत असल्याचं सांगितलं.

Go First Airlines News
Eknath Shinde : लखनऊ विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री बोलले; म्हणाले पहिल्यांदाच...

आयएएस सोनल यांनी ट्विटसोबत आपला एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रवाशी विमानात बसलेले दिसत आहेत आणि उड्डाणाची वाट बघत आहेत. त्यांच्या या ट्विटवर गो फर्स्ट एअरलाईन्सने प्रतिक्रिया देत होणाऱ्या उशिराबद्दल माफी मागितली आहे.

कंपनीने लिहिलं की, आपल्याला होत असलेल्या उशिराबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही वेळेवर उड्डाण व्हावं, यासाठी खूप मेहनत घेतो. परंतु कधी-कधी अनपेक्षित घटना घडतात. भविष्यात आम्ही आपला अपेक्षाभंग करणार नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com