esakal | पश्चिम बंगालमध्ये आता पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स

बोलून बातमी शोधा

Mamata-Banerjee

पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स; ममता बॅनर्जींची घोषणा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलकाता : पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर आता सर्व पत्रकार कोविड वॉरियर्स असतील अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे कोविडच्या या जीवघेण्या कामात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पत्रकारांना कोविड वॉरियर्ससाठी मिळणारे लाभही मिळू शकणार आहेत. कालचं ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी श्रमिक पत्रकारांना फ्रन्टलाईन कोविड वॉरियर्स घोषीत केलं होतं.

हेही वाचा: लढा कोरोनाशी! टाटा ग्रुप करणार 2 हजार कोटींचा खर्च

कोविड वॉरियर्सना सरकारच्यावतीनं आरोग्य विम्यांचा लाभ, विविध सोयी-सुविधा त्याचबरोबर जर या काळात काम करताना कोविड वॉरियर दगावला गेल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येते. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील पत्रकारांना आता सर्व लाभ मिळू शकणार आहेत.

हेही वाचा: "एकट्या मोदींना हे झेपणार नाही"; नवाब मलिकांचे टीकास्त्र

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रविवारी राज्यातील श्रमिक पत्रकारांना फ्रन्टलाईन कोविड वॉरियर्स संबोधण्यात येईल अशी घोषणा केली होती. पटनाईक म्हणाले होते, "कोविड काळात पत्रकार राज्यासाठी महत्वाच्या बातम्या पुरवून मोठी सेवा देत आहेत. तसेच जनतेला ते कोरोनाशी संबंधीत विषयांबाबत जागृत करत आहेत. कोविडविरोधातील लढ्यात पत्रकारांचा आपल्याला मोठ सहकार्य मिळत आहे"

हेही वाचा: कोरोना काळात SBI आली पुढे; कोट्यवधींची मदत

यामुळे ओडिशातील सुमारे ६,५०० पत्रकारांना याचा फायदा होणार असून सध्या ६,९४४ पत्रकारांना राज्य शासनानं विम्याचं संरक्षण दिलं आहे. गोपाबंधू संबादिका स्वास्थ्य बीमा योजनेतून प्रत्येकी २ लाखांचा विमा संरक्षण मिळत आहे. त्याचबरोबर जर एखाद्या पत्रकाराचा कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री पटनाईक यांनी केली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील गेल्या आठवड्यात सर्व पत्रकारांना कोविड फ्रन्टलाईन वर्कर्स घोषीत केलं होतं.