esakal | गोव्यात 5 दिवस पूर्ण लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

बोलून बातमी शोधा

Goa Chief Minister Pramod Sawant

गोव्यात 5 दिवस लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पणजी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पाच दिवसांचे लॉकडाऊन उद्यापासून लागू करण्यात येणार आहे. गोवा हे कर्नाटकनंतर दुसरं भाजपशासित राज्य आहे जिथं लॉकाडाऊन करण्यात आलं आहे.

गोव्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद राहील. मात्र उद्योगधंदे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असंही आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

हेही वाचा: नायब राज्यपालांच्या हातात केजरीवाल सरकार; केंद्राची अधिसूचना

लोकांनी जर पुढचे पाच दिवस कडक लॉकडाऊनचे पालन केले तर संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं. कॅसिनो, बार लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. तर रेस्टॉरंट फक्त पार्सल सुविधा देऊ शकतात. अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात येण्यास किंवा जाण्यासाठी बंदी नसेल असंही सांगण्यात आलं आहे.