Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

श्रीमंत मतदारसंघ अशी कळंगुटची ओळख आहे.
Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

गोव्यातील (Goa) कळंगुट मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणारे मायकल लोबो विरूद्ध भाजपाचे (BJP) जोसेफ सिक्वेरा अशी लढत असून एकेकाळी एकत्र काम केलेले नेते आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

भाजपाने कळंगुट मतदारसंघातून माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना उमेदवारी दिली आहे. मायकल लोबो यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली होती. तर जोसेफ यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. कळंगुट हे पर्यटकांचं आवडते ठिकाण असून श्रीमंत मतदारसंघ अशी या जागेची ओळख आहे.

Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?
सिद्धूवर बहिणीचा गंभीर आरोप: म्हणाल्या, संपत्तीवर कब्जा करून...

लोबोंविरोधात भाजपाचे कॅथलिक कार्ड

भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेल्या लोबोंचा कळंगुटवर प्रभाव आहे. या मतदारसंघात लोबोंनंतर भाजपाला हेवीवेट उमेदवार हवा होता. या मतदारसंघातून भाजपाकडून गुरुदास शिरोडकर यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. शिरोडकर हे भाजपाने जुने कार्यकर्ते. मात्र, लोबोंविरोधात कॅथलिक कार्ड वापरण्याच्या उद्देशाने भाजपाने जोसेफ सिक्वेरा यांना संधी दिली.

एकेकाळचे सहकारी आता विरोधक

२०१२ मध्ये लोबोंनी पहिल्यांदा भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी जोसेफ सिक्वेरा हेदेखील त्यांच्यासोबत होते. तेव्हा दोघांचे ध्येय एकच होते ते म्हणजे तत्कालीन आमदार आग्नेल फर्नांडिस यांना पराभूत करायचे. पण नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. जोसेफ यांनी थेट लोबोंशीच पंगा घेतला. २०१७ मधील निवडणुकीत लोबोंनी जोसेफ यांचा ३,८११ मतांनी पराभव केला. इतकंच नव्हे, कळंगुट पंचायत समितीही त्यांनी जोसेफ यांच्याकडून हिसकावून घेतली होती.

Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?
CM चन्नींचा भाऊ लढणार अपक्ष; उमेदवारी अर्ज दाखल

लोबोंची धूर्त खेळी?

लोबोंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझीस हे तिघेही तृणमूल काँग्रेसमध्ये होते. लोबोंविरोधात त्यांचा प्रचारही सुरू होता. मात्र, आयत्यावेळी जोसेफ यांनी भाजपात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे लोबोंविरोधात प्रचार करणाऱ्या त्रिकुटात फूट पडलीये. या मतविभाजनाचा फायदा शेवटी लोबोंनाच होणार आहे. लोबोंनीच ही धूर्त चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

कळंगुटचा किंग कोण?

कळंगुटमध्ये काँग्रेस आणि भाजपापेक्षा जास्त मतं लोबोंची आहेत, असे राजकीय विश्लेषक सांगतात. लोबोंनी 2012 मध्ये आग्नेल फर्नांडिस तर २०१७ मध्ये जोसेफ यांचा पराभव केला होता. यंदा लोबो विजयाची हॅट्ट्रीक साधणार का,याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे २०१७ पर्यंत जोसेफ जेवढे ‘लाईम लाईट’मध्ये होते. तेवढे आता नाहीत. पण अशा परिस्थितीत ते लोबोंना रोखण्यात कितपत यशस्वी ठरतील हे बघितले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com