पार्सेकर, देवाची तशी इच्छा नव्हती... 

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

पणजी : मतदानापूर्वी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे माविन गुदिन्हो विजयी झाले.

गुदिन्हो दाबोळीतून भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला. दरम्यान, देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास व्यक्त करणारे मुख्यमंत्री पार्सेकर पराभूत झाले आहेत. त्यामुळे देवाची तशी इच्छा नव्हती म्हणून पार्सेकर विजयी झाले नाहीत अशी टिपण्णी करणारे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. 

गोवा विधानसभा निवडणुकीत पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा 7,119 मतांनी पराभव झाला आहे. त्यांनी मांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निकाल हाती येण्याआधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं होत. देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

सकाळी अकरा वाजेपर्यंत मतमोजणीमध्ये काँग्रेसच्या आघाडीचा कौल कायम दिसून आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर होता, तर भाजपला 7 जागांवर आघाडी मिळाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर असून, येथे खाते उघडण्याची शक्यता दिसत आहे. महराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 उमेदवार आघाडीवर होते. तसेच, गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक, तर अपक्ष एक उमेदवार आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.  

माविन गुदिन्हो विरोधी कॉंग्रेसमध्ये असतानाही भाजपने त्यांना दक्षिण गोवा नगरनियोजन प्राधिकरणाचे अध्यक्षपद दिले होते. या मतदारसंघात 'मगो'चे विनायक नाणोस्कर यांचा विजय होईल अशी मोठी चर्चा होती. मात्र पक्ष बदलूनही मतदारांचा विश्‍वास कायम ठेवण्यात गुदिन्हो यांना यश आले आहे.

Web Title: Goa election Laxmikant Parsekar Manohar Parrikar BJP