गोवा सरकारचे मासे वाहतुकीवर निर्बंध

अवित बगळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पणजी : गोव्यात 3 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून केवळ पत्रादेवी व पोळे येथील सिमेवरूनच मासे आणता येणार आहेत. त्याशिवाय येत्या १५ दिवसात मासेमारी व्यापाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नोंदणी करणे व १५ दिवसानंतर केवळ मासे वाहून नेण्यासाठी बनविलेल्या खास वाहनांतूनच (इन्सुलेटेड ट्रक्स) मासे आणणे सक्तीचे असेल. आरोग्य खात्याच्या अवर सचिव मारीया सेओमारा डिसोझा यांनी तसा आदेश आज जारी केला.

मासे टिकवण्यासाठी फॉर्मेलीन या घातक रसायनाचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर गोवा सरकारने १८ जुलैपासून १५ दिवसांसाठी राज्याबाहेरील मासे आणण्यावर बंदी घातली होती. ती बंदी वाढवली जाणार नाही असेही आज सरकारने स्पष्ट केले.

अारोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, मासे टिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याच्या कथित आरोपानंतर लोकांच्या मनांत बाहेरून अाणल्या जाणाऱ्या माशांविषयी भीती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे काही कडक उपययोजना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सुचनेनुसार केली आहे. त्यानुसार सिमांवर उद्या मध्यरात्रीपासून अन्न व औषध प्रशासन खात्याची पथके कार्यरत होतील. पोलिस, वाहतूक खाते आणि मत्सोद्योग खात्याच्या सहकार्याने मालवाहू गाड्यांची तपासणी करण्यात येईल.

ते म्हणाले, राज्याबाहेरून मासे आणणाऱ्या व्यापाऱ्यांना १५ दिवसात अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नोंदणी करावी लागणार आहे. १५ दिवसानंतर असे परवाने नसलेल्या व्यापाऱ्यांची वाहने सिमेवरच अडवली जातील. या शिवाय मासळीची वाहतूक केवळ इन्सुलेटेड वाहनांतूनच करावी लागणार आहे. मासळीची अन्य वाहनांतून वाहतूक केल्यास तीही वाहने अडवली जातात.  स्थानिक मासे व्यापाऱ्यांनी याची कल्पना बाहेरील मासळी व्यापाऱ्यांना द्यावी तसेच आणली जाणारी मासळी टिकवण्यासाठी आरोग्यास धोकादायक गोष्टींचा वापर होता याची काळजी घ्यावी.

Web Title: goa government restricted fishery business