पर्रीकरांच्या आरोग्य अहवालावर सरकारचा आज निर्णय

अवित बगळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी माहिती सीलबंद लखोट्यात देणे वा न देण्याविषयीचा निर्णय सरकार आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर करणार आहे. तसा अहवाल देण्याविषयी काल न्यायालयाने विचारणा केली तेव्हा महाधिवक्ता उपस्थित नव्हते. न्यायालयाच्या या सुचनेस याचिकादारांच्या वकीलांनी सहमती दर्शवली आहे.

याचिकादारांचे वकील ब्राझ डिसा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काल न्यायालयाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सह्या अन्य कोणी व्यक्ती करत असल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले,  राज्याच्या मुख्य सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून तोंड़ी सूचना घेण्यात येतात असे म्हटले आहे. त्यामुळे हा गंभीर मुद्दा आहे. आम्हाला आता जाणून घ्यायचे आहे की ते सही तरी करु शकतात का. या सूचना कोणा समक्ष दिल्या जातात आणि त्याची नोंद कोण ठेवतो. त्याही पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे सरकारी कामकाज नियमावलीत अशा गोष्टीला थारा आहे का. त्याविषयी आम्हाला शंका आहे.

Web Title: Goa Government s decision on Manohar Parrikar s health issue