Kerala Floods : उध्वस्त केरळला गोव्याकडून पाच कोटींचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

गोव्यातील सरकारी कर्मचारीही एक दिवसाचे वेतन केरळ पूरग्रस्तांना देतील अशी शक्यता आहे. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आले.

पणजी : केरळातील पूरग्रस्तांना जगभरातून मदत मिळत असतानाच गोवा सरकारकनेही पाच कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. गोवा सरकारने केरळच्या मुख्यमंत्री मदतनिधीस पाच कोटी रूपये देण्याचा आज (ता. 23) निर्णय घेतला.

गोव्यातील सरकारी कर्मचारीही एक दिवसाचे वेतन केरळ पूरग्रस्तांना देतील अशी शक्यता आहे. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आले. ज्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केरळच्या मदतनिधीस 5 कोटी देण्याचे मंजूर केले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही मदत मिळेल अशी इच्छा व्यक्त केली गेली आहे. 

केरळमध्ये महिनाभर मुसळधार पावसाने हाहाकार मांडला होता. 300 हून अधिक लोकांचे जीव या पूरात गेले. तसेच अनेक नागरिक बेघर झाले. केरळला देशासह जगभरातून विविध स्वरूपात मदत मिळाली. पावसाचा जोर कमी झाल्याने केरळमधील जीवन सुरळीत होण्याची शक्यता आहे.   

 

Web Title: goa helps with 5 crores to kerala flood victims