Modi Cabinet : श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाचव्यांदा निवडून आलेले भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.

पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाचव्यांदा निवडून आलेले भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यामागील सरकारात ते आयुष खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री होते. त्यांनी यावेळी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा 80 हजार मतांनी पराभव केला आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नसताना त्या मतदारसंघातून सतत पाचव्यांदा निवडून येण्याचा विक्रम नाईक यांनी केला आहे.

1994 मध्ये ते प्रथम गोवा विधानसभेवर निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अर्थ व नंतर जहाजोद्योग राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa MP Shripad Naik gets chance in cabinate