

Goa Fire Incident 23 Dead
esakal
Nightclub Fire Cause Goa : गोव्यातील उत्तर भागात असलेल्या अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून २३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि २० पुरुषांचा समावेश असून काही पर्यटकांचाही यात समावेश आहे. स्फोटात झालेला धूर आणि आगीमध्ये गुदमरल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.