

Goa Nightclub Fire Claims Four Lives from One Delhi Family
Esakal
गोव्यातील नाइट क्लबमध्ये आगीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. यात दिल्लीतील एकाच कुटुंबातल्या चौघांचा समावेश आहे. जीव गमावणाऱ्यांमध्ये तीन बहिणी आहेत. यापैकी दोघी त्यांच्या एका बहिणीला वाचवण्यासाठी धगधगणाऱ्या आगीत गेल्या पण कुणीच परतलं नाही. कुटुंबाची ही पहिलीच गोवा ट्रिप अखेरची ठरली.