

After 25 Deaths Goa Nightclub Found Operating Without Fire Clearance
Esakal
गोव्यातील रोमियो लेन नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री भीषण आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. आगीपासून वाचण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था या नाइट क्लबमध्ये नव्हती अशी माहिती आता समोर येतेय. दरम्यान, नाइट क्लबचं बांधकाम ते तिथली व्यवस्था याबाबत अनेक धक्कादायक खुलासे आता होत आहेत. नाइट क्लब सरकारी जमिनीवर बांधण्यात आला होता. सरळ सरळ नियमांचं उल्लंघन करूनही हा क्लब सुरू होता. प्रशासनाकडून याकडे डोळेझाक करण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.