

Scene of the Romeo Lane Beach Night Club in Goa where a massive fire broke out, prompting the government to initiate demolition action.
esakal
Goa Fire Incident at Romeo Lane Beach Night Club : गोव्यातील एका मोठ्या नाईटक्लबला आग लागून त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता गोवा सरकारने संबंधित नाईटक्लब विरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाईटक्लबर बुलडोजर चालवून तो उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे आता लुथरा बंधूंचा रोमिया लेन बीच क्लब लवकरच उद्ध्वस्त केला जाऊ शकतो. शिवाय, काल(सोमवार) पोलिसांनी क्लबचे दोन मालक, सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्याविरोधात इंटरपोलची नोटीस जारी केलेली आहे. गोव्यातील आगीनंतर, दोन्ही क्लब मालक दिल्लीमार्गे थायलंडला पळून गेले आहेत. तर त्यांची नावे आता इंटरपोलच्या यादीत आली आहेत. पोलिस त्यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेले आहेत.
याशिवाय, गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने लुथरा बंधूंविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तसेच मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाला नाईटक्लब उद्ध्वस्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "हा नाईटक्लब सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. तो मंगळवारी पाडण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे."
गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत पाच पर्यटकांसह २५ जणांचा मृत्यू झालेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. गोवा पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. तथापि, क्लबचे मालक देश सोडून पळून गेले आहेत आणि त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.