पाणी उपलब्धतेबाबतीत गोवा आघाडीवर: सुदिन ढवळीकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पणजी (गोवा): देशातील इतर राज्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती पाहता स्वच्छ आणि निर्जंतुक पिण्याचे पाणी गोव्याच्या प्रत्येक कोण्यातील नागरिकाला मिळते. इतर राज्यांच्या बाबतीत तुलनेने गोवा हे अद्यापही पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत देशभरात आघाडीवर असल्याचे मत गोव्याचे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज (शुक्रवार) व्यक्‍त केले.

बांबोळी येथील श्‍यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 24व्या इंडियन प्लंबिंग परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही परिषद आजपासून म्हणजेच 24 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत होणार आहे.

या परिषदेत देशातील पाणीप्रश्‍न आणि भविष्यातील परिस्थिती या विषयावर चर्चाविनिमय करण्यात येणार आहेत. सागरी किनारी प्रदेशात पाणी संवर्धन दृष्टिकोनातून पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याच्या पद्धती या विषयावर विविध मान्यवर तज्ञांतर्फे प्रायोगिक माहितीही देण्यात येणार आहे. शाश्‍वत विकासाच्या हेतूने प्लंबिंग या विषयावर भर देण्यात येणार असून विविध प्रकारच्या पाण्याची निगडित प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Web Title: Goa is on top of water supply: suding dhavalikar