देश
Goa : समुद्रात २५ पर्यटकांची बोट उलटून भीषण दुर्घटना
Goa Boat capsized : गोव्यातील कळंगुट बीचवर २० ते २५ पर्यटकांची बोट समुद्रात उलटून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
गोव्यात कळंगुट बीचवर पर्यटकांची बोट उलटल्याची दुर्घटना घडलीय. बुधवारी उत्तर गोव्यातल्या कळंगुट बीचवर घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर २० पेक्षा जास्त पर्यटक बोटीतून प्रवास करत होते. २० जण जखमी झाले आहेत. तर एकाच कुटुंबातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.