गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या नावामुळे, आरोपीच्या आईचं नाव होतं एलेना; कारण काय?

Two Russian Women Murder Case हत्या झालेल्या दोन्ही महिलांचं नाव एलेना असं असल्यानं आणि आरोपी एकच असल्यानं हे प्रकरण गुंतागुंतीचं बनलं होतं. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
Same Name Same Accused Goa Murder Mystery

Same Name Same Accused Goa Murder Mystery

Esakal

Updated on

मोरजी आणि हरमल हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला रशियन नागरिक आलेक्सेई लिओनोव्ह याच्या चौकशीतून आता अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी माहिती समोर येत आहे. हत्या झालेल्या दोन्ही महिलांचं नाव एलेना असं असल्यानं आणि आरोपी एकच असल्यानं हे प्रकरण गुंतागुंतीचं बनलं होतं. पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी आरोपीने अनेकदा त्याच्या जबाबाबत बदल केले. त्याने याआधी अनेक महिलांची हत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता तपासात समोर आलेल्या माहितीमुळे खळबळ उडालीय. आरोपीने सांगितलं की, दोन्ही महिलांचं नाव एलेना असं होतं त्यामुळे मला त्यांचा तिरस्कार वाटत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com