
Goa Zuari Bridge Accident : ओव्हर टेक करणं पडलं महागात; चार प्रवाशांचा मृत्यू
Goa Zuari Bridge Accident : गोव्यातील झुआरी पुलावरून कोसळून झालेल्या अपघातग्रस्त कारचा शोध घेण्यात बचाव पथकाला 12 तासांनंतर यश आले असून, यात गाडीतील सर्व चारही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास घडला होता. मात्र, काळोखामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याने रात्रीच्यावेळी शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र, आता कार आणि त्यातील प्रवाशांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
हेही वाचा: Police : गाडीत पेट्रोल कमी असल्याने पोलिसाने ठोकला दंड; जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत
आल्विन आरावजी, हेन्री आरावजो, प्रेसिला क्रुझ, ऑस्टिन फर्नांडिस अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त गाडी लोटली येथून पणजीच्या दिशेने निघाली होती. हा अपघात एवढा भीषण होता ज्यात कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला आहे.
हेही वाचा: President Remark Row : सोनिया गांधींकडून काँग्रेस नेत्याची पाठराखण; म्हणाल्या, ''त्यांनी...''
कसा घडला अपघात
घटनेपूर्वी अपघातग्रस्त वाहनाच्या पुढे असलेल्या एका टॅक्सी चालकाने त्याचा वाहनाच्या साईड आरशामध्ये मागून येणारी ही गाडी पाहिली होती. ही गाडी भरधाव वेगात होती. त्यावेळी या गाडीने एका टॅक्सीला ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकून नदीत कोसळली.
Web Title: Goa Zuari Bridge Accident All Four Passengers Dead Bodies Found
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..