Police : गाडीत पेट्रोल कमी असल्याने पोलिसाने ठोकला दंड; जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत

या चलानमध्ये दुचाकीमध्ये पुरेसे इंधन नसल्यामुळे त्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
Traffic Chalan
Traffic Chalan Sakal

Traffic Police Chalan : ट्रॅफिक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने चलान कापल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील, पण आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जे खूपच रंजक आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक चलान पावती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये दुचाकीमध्ये कमी पेट्रोल असल्याने हे चलान कापण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, हा खरोखर गुन्हा आहे का? किंवा हे चलान वाहतूक पोलिसांकडून चुकून कापले गेले आहे. याबद्दल आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहोत.

Traffic Chalan
President Remark Row : सोनिया गांधींकडून काँग्रेस नेत्याची पाठराखण; म्हणाल्या, ''त्यांनी...''

कापलेले चलन योग्य आहे का?

केरळमधील निवृत्त मोटार वाहन विभागाचे निरीक्षक थंकाचन टीजे यांनी या घटनेबद्दल सांगितले की, त्यांना वाहतूक पोलिसांनी कापलेल्या या चलानचे फोटो आणि स्क्रीनशॉट प्राप्त होत आहे. या चलानमध्ये दुचाकीमध्ये पुरेसे इंधन नसल्यामुळे त्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत असून ही घटना केरळमध्ये घडली असून, केरळ एमव्हीडीनेच हे चलान दिले आहे. अशा प्रकारे चलान कापण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे माजी एमव्हीडी निरीक्षकांनी सांगितले. तसेच केरळ मोटार वाहन कायदा किंवा सीएमव्हीआरमध्ये अशा प्रकारचे कोणतेही कलमाबाबत ऐकलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Traffic Chalan
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज

इंधनाशी संबंधित हा नियम लागू आहे

थंकाचन पुढे सांगतात की, अशाच प्रकरणाशी संबंधित आणखी एक गुन्हा आहे, जो अनेक लोक नकळत करतात. हे व्यावसायिक वाहनांना लागू होते. जे प्रवासासाठी वापरले जातात. असे कोणतेही वाहन, मग ते कार, व्हॅन, बस किंवा सार्वजनिक सेवेसाठी वापरण्यात येणारे कोणतेही वाहन असो, ज्यामध्ये इंधन भरण्यापूर्वी प्रवाशांना बाहेर काढणे आवश्यक आहे. चालक किंवा वाहन मालकाने तसे न केल्यास त्याला 250 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा नियम फक्त व्यावसायिक वाहनांना लागू आहे खाजगी वाहनांना नाही.

Traffic Chalan
सेक्सुअल पार्टनरची संख्या कमी करा, Monkeypox च्या पार्श्वभूमीवर WHO चा सल्ला

याआधीही घडली होती अशी घटना

टीजे पुढे म्हणाले की, अशा प्रकारे चुकीचे चलान कापल्याने सामान्य लोकांमध्ये मोटार वाहन विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होत नाही. भविष्यात अशी प्रकरणे हाताळताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी चुकीचे चालान काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी दिल्ली वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल एका व्यक्तीला चलान दिले होती. मात्र, हे खोटे चलान होते, कारण ज्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आला तो प्रत्यक्षात कार चालवत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com