पंतप्रधानांना मूर्ख म्हणणाऱ्या पायलटला 'गोएअर'ने कामावरुन काढलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं गोएअरच्या पायलटला महागात पडलं आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं गोएअरच्या पायलटला महागात पडलं आहे. गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं आपल्या पायलटला कामावरून काढून टाकलं आहे. कर्मचाऱ्याने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यामुळे त्याला निलंबित केलं जात असल्याचं गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा

मिकी मलिक असं त्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिकने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी ट्विट केलं होतं. त्याने मोदींवर टीका केली होती. आपल्या देशाचे पंतप्रधान मूर्ख आहेत. तुम्ही मलाही मूर्ख म्हणा, मला त्याचं वाईट वाटणार नाही. कारण, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मूर्ख आहेत, असं वादग्रस्त ट्विट मिकी मलिक याने केलं होतं. त्यानंतर कंपनीने मलिकला कामावरुन काढण्याचा निर्णय घेतला. 

मिकी मलिक याच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर संताप पाहायला मिळाला. अनेकांनी ट्विट करत मलिकला सुनावलं होतं. वाद वाढत असल्याचं पाहून मलिकने ट्विट डिलिट केलं. तसेच माफीही मागितली. मलिकने आपलं अकाऊंट लॉक केलं आहे. ''पंतप्रधान यांच्याविषयी वापरलेल्या वक्तव्यांबद्दल मी माफी मागतो. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. माझ्या वक्तव्याचा गोएअरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही'', असं मिकी मलिकने म्हणाला होता. 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

दरम्यान, गोअरने तात्काळ कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं आहे. अशा प्रकारची वक्तव्य आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाहीत. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे आवश्यक असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. गोएअरने यापूर्वीही अशा प्रकारची कारवाई केली आहे. 2020 मध्ये एका प्रशिक्षणार्थी पायलटने सीता आणि हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर कंपनीने त्याला काढून टाकले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goair fires pilot after criticizing tweet against narendra modi