देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान

टीम ई-सकाळ
शनिवार, 15 जून 2019

- निती आयोग बजावतेय महत्त्वाची भूमिका.

नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे वचन पूर्ण करण्यासाठी निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच देशात 2024 पर्यंत पाच लाख कोटी आर्थिकवृद्धीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले. 

'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' बैठकीतून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी निती आयोगाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, येत्या 2024 पर्यंत पाच लाख कोटी अर्थव्यवस्था असणारे देश भारत असला पाहिजे. मात्र, ही बाब आव्हानात्मक असली तरी मोठे परिश्रम घेतल्याने सिद्ध करता येऊ शकते. 

दरम्यान, आम्ही प्रशासकीय यंत्रणा पारदर्शी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goal to make India 5 trillion dollar economy says Narendra Modi