मुख्यमंत्री म्हणतात, 'राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय'

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

- राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय.

- सरकार स्थिर राहावे, ही माझी जबाबदारी

नवी दिल्ली : कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून समोर आला आहे. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय. मात्र, सरकार स्थिर राहावे, ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे''.  

तसेच कुमारस्वामी पुढे म्हणाले, की मी तुम्हाला वचन देतो, की तुमच्या अपेक्षा नक्की मी पूर्ण करेन. पण आज मी ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे ती व्यक्तही करू शकत नाही. पण या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील सरकार स्थिर राहावे, ही माझी जबाबदारी आहे. ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, कुमारस्वामी यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यातील जेडीएस-काँग्रेस सरकारला कोणताही धोका नाही. भाजपकडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Going through pain everyday says Kumaraswamy