सोन्याला आलाय 35 हजारांचा 'भाव'!

Gold
Gold

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याने प्रतिदहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे.

जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदरकपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात वाढ सुरूच आहे. येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्‍यता असून, वर्षअखेरपर्यंत सोन्याच्या भावात 3 हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जागतिक बाजारात सोन्याचा भाव जून महिन्यात 19 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. 19 वर्षांपूर्वी जून महिन्यात सोन्याचा भाव 1430 डॉलरवर जाऊन पोचला होता. जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती असल्याने सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदारांनी पुन्हा एका सोन्याकडे मोर्चा वळविला आहे.

अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध लादले असून, यामुळे तेलाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजारातदेखील मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होण्याची शक्‍यता असल्याने सोन्याला पहिली पसंती दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com