

Gold Price Record High latest price
esakal
Gold crosses Rs 1.5 lakh : जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील व्याजदर धोरणात नरमाईचे संकेत, जगभरातील केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोन्याची मोठी खरेदी आणि वाढती जागतिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दराने १० आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ४३०० ते ४४०० डॉलरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही होण्याची शक्यता आहे.