Gold Silver Price : चांदी 2700 रुपयांनी महाग तर सोन्याचा दरही उसळला ; जाणून घ्या अपडेट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold price

भारतीय सराफ बाजारात गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

चांदी 2700 रुपयांनी महाग तर सोन्याचा दरही उसळला

भारतीय सराफ बाजारात गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price)वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ते ४९ हजार रुपये आहे. तर चांदीचा दर 63 हजार रुपये प्रति किलोवरून 66 हजारांवर पोहोचला आहे. आठवडाभरात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १३०१ रुपयांनी वाढला आहे. तर 999 चांदीच्या दरात किलोमागे २७३४ रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा: 'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने(Indian Bullion Jewelers Association) जाहीर केलेल्या किमतींवरून ५ नोव्हेंबरला सोन्याचा दर ४७७०२ रुपये प्रति १० ग्रॅम होता तोच दर 12 नोव्हेंबर रोजी ४९००३ रुपयां पर्यंत पोहोचला. शुक्रवारी (ता.१२ ) संध्याकाळी दरात घसरण झाली आहे. IBJA नुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर सकाळी ४९२४३ रुपये होता. तर संध्याकाळी तोच दर ४९००३ रूपयांनी वाढ झाली. तर चांदीत ६७०१६ वरून ६६२८५ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) द्वारे दिलेला दर हा देशभरातील सोने व चांदीचा असतो. त्यांच्या किमतींमध्ये जीएसटी (GST)समाविष्ट नसते. दागिने खरेदी करताना 'जीएसटी' चा दर लावल्यामुळे सोने किंवा चांदीचे दर वाढतात.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी केला जात नाही. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे दिली जाते.

loading image
go to top