'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...
'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...

'UPSC' मध्ये अपयश; IAS अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...

मुंबई - देशातील बहुसंख्य तरुण आपल्या सनदी अधिकारी व्हायचं असं स्वप्न घेऊन दिल्लीत युपीएससीच्या तयारीला लागतात. लाखो विद्यार्थी त्या परिक्षेला बसतात. मात्र त्यातून तीन अंकी संख्येतील उमेदवारच या परिक्षेत उत्तीर्ण होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून युपीएससी परिक्षेची क्रेझ वाढली आहे. आता तर या सनदी अधिकाऱ्यांच्या क्षेत्राची भुरळ ओटीटी प्लॅटफॉर्मलाही पडली आहे. युपीएससीवर काही मालिका तयार करण्यात आल्या आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. कोटा फॅक्टरी नावाच्या मालिकेमध्ये या विषयाला काही अंशी स्थान देण्यात आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एका एका व्हिडिओनं युपीएससीची परिक्षा देणाऱ्या तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरुन मिळालेल्या माहितीनुसार तो व्हिडिओ एका सनदी अधिकाऱ्यानं शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांनी तरुणांना तुम्ही युपीएससी क्रॅक करु शकत नाही तर मग काय कराल...म्हणून तर हा व्हि़डिओ पाहण्याचे आवाहन केले आहे. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. वास्तविक त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी ज्या गोष्टी आपण प्राधान्यक्रमानं करायला हव्यात त्या करत नाहीत म्हणून त्यांना अपयश येते. हे विडंबनाच्या माध्यमातून सांगितले आहे.

युपीएससीची परिक्षा ही देशातील सर्वात अवघड परिक्षांपैकी एक असणारी परिक्षा आहे. लाखो विद्यार्थी त्याची तयारी करतात. मात्र त्यापैकी फार कमी जणांना त्यात यश येते. अशा परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एका सनदी अधिकाऱ्य़ानं मार्गदर्शन केलं आहे. सनदी अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करताना काय काळजी घ्यायला हवी हे सांगितलं आहे. त्यांनी तो व्हिडिओ शेयर करताना त्याला कॅप्शन दिलं आहे की, युपीएससीची परिक्षा फेल कशी व्हाल....हे आपल्याला या व्हिडिओतून चांगल्याप्रकारे सांगण्यात आले आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला 65 हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

loading image
go to top