esakal | जागतिक बाजारपेठेचा परिणाम; सोने-चांदी दरात घट
sakal

बोलून बातमी शोधा

gold silver

जागतिक बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या तब्येतीवर आहे. सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस 1900 डॉलरवर स्थिर झाले होते.

जागतिक बाजारपेठेचा परिणाम; सोने-चांदी दरात घट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसले आहे. सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX - Multi-Commodity Exchange) सोन्याचे दर प्रतिग्रॅम 0.9 टक्क्यांनी कमी होऊन 50 हजार 130 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दरातही 0.88 टक्क्यांची घट होऊन चांदी प्रतिकिलो 60 हजार 605 रुपयांवर आली आहे. 

शुक्रवारी सोन्यात दर 0.4 टक्के वाढला होता. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्यावेळेस सोन्याचे दर प्रतिग्रॅम 56 हजार 200 रुपयांवर गेले होते. तर दुसरीकडे चांदीचे दर प्रतिकिलो 80 हजारांपर्यंत गेले होते. 

जन धन खात्यात झिरो बॅलन्स तरीही काढता येतील 5 हजार रुपये
 
जागतिक बाजारपेठेतील सोन्याची स्थिती-
जागतिक बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या तब्येतीवर आहे. सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस 1900 डॉलरवर स्थिर झाले होते. मागील काही दिवसांपासून डॉलरमुळे सोन्याच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला होता. डॉलर सोन्याच्या तुलनेत मजबूत झाल्याचे दिसले होते. पण सोमवारी डॉलर उतरल्याने गुंतवणुकदांरांचा ओढा सोने खरेदीकडे दिसत आहे. 

देशातील कोरोनास्थिती जाणून घ्या...

दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती असेल?
विश्लेषकांच्या मते सोन्याच्या भावात झालेली घसरण याचा अर्थ तो आधीच्या पातळीवर येईल असा होत नाही. सध्या सोने 50 हजार रुपये आणि चांदी 60 हजार रुपयांच्या जवळपास आहे. पुढील काळात ही सोने-चांदीच्या दरात चढउतार होण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात कोणतीही मोठी वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता नाही. दिवाळीच्या दिवशीही सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 50 ते 52 हजार रुपये राहू शकतो.