

Gold Silver News
esakal
Gold Silver Price : अमेरिकी डॉलरची वाढती ताकद आणि अमेरिकन ट्रेझरी बाँडच्या वाढलेल्या यिल्डमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम भारतातील सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही दिसून आला. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, दर स्थीर राहू शकतात परंतु काही दिवसांनी पुन्हा चढ उतार पहायला मिळेल.