

Gold Price Fall silver rate
esakal
Gold Rate : सोने चांदीच्या दरात मे महिन्याच्या सुरूवातीला मोठी वाढ झाली होती. दरम्यान मागच्या १० दिवसांत विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आता लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 1,654 रुपयांची घट झाली असून तो 1.56 लाख रुपयांवर आला आहे.