esakal | आला दसरा, महागणार सोने! खरेदीसाठी 'ही' योग्य वेळ; जाणून घ्या लेटेस्ट भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gold

आला दसरा, महागणार सोने! खरेदीसाठी 'ही' योग्य वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Today) किमतीत चढ-उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा (dasara festival) अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपला असून यादिवशी सोने खरेदी (gold buy) करण्याची प्रथा आहे. अशातच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी आज योग्य संधी आहे.

सोने खरेदीसाठी आज योग्य संधी

मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वर जाण्यापूर्वी खरेदीसाठी आता योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात 0.19 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,141 रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.02 टक्क्यांची वाढ होऊन चांदीचा प्रतिकिलो दर 60,693 रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये, काश्मीर, दिल्ली, यूपीमध्ये १८ ठिकाणी छापे

आजचा सोन्याचा दर...गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी

डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.19 टक्के वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर 47,141 रुपये प्रति तोळावर आहे. तर चांदीच्या भावात 0.02 टक्के किरकोळ वाढ झाल्यानंतर दर 60,963 रुपये प्रति किलोवर आहे.

सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9059 कमी आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. आज भाव 47,141 रुपये प्रति तोळा आहे. त्यामुळे रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचा दर 9059 रुपयांनी कमी आहे

हेही वाचा: सावधान! मिठाई घेताय तर जरा एक्‍स्पायरी डेटकडेही असू द्या लक्ष

सोने खरेदीची आताच योग्य संधी....कारण...

तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

सोन्याचे दर भिडणार गगनाला

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

loading image
go to top