कोरोनामुळं वाढलेला सोन्याचा भाव दुसऱ्याच दिवशी घसरला

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत पातळीवर मंगळवारी सोन्याचा भाव गडगडला. दिल्लीत सोन्याचा भाव आज 954 रुपयांनी कोसळला.

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत पातळीवर मंगळवारी सोन्याचा भाव गडगडला. दिल्लीत सोन्याचा भाव आज 954 रुपयांनी कोसळला. सध्या सोन्याचा दर तोळ्याला (10 ग्रॅम) 43 हजार रुपयांच्यावर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण
आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेल्या तेजीमुळे काल (ता. 24) देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने उसळी घेतली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची चिंता कमी झाल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 648 डॉलरवर आला. याचवेळी चांदीचा भावही प्रतिऔंस 18.40 डॉलरवर आला, अशी माहिती एचडीएफसी सिक्युारिटीजचे वरिष्ठ विश्लेयषक तपन पटेल यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घसरण, शेअर बाजाराती तेजी आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव कोसळला. दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 954 रुपयांची घसरण होऊन 43 हजार 549 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 80 रुपयांची घट होऊन 49 हजार 990 रुपयांवर आला.

आणखी वाचा - दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी ओवैसींनी सुचवला पर्याय

कोरोनचा असा परिणाम
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळं सध्या जागतिक बाजारपेठेवर परिणाम होऊ लागला आहे. चीनमधील अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे. चीनमधील कंपन्यांच्या किंवा चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून असलेल्या जगभरातील इतर बड्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे. परिणामी शेअर बाजारात घसरण होत आहे. शेअर मार्केटमधील या परिस्थितीमुळं गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे आहे. परंतु, रुपया वधारल्यामुळं आज सोन्याचे भाव घसरले.

आणखी वाचा - हिंदू टेररिस्ट ट्विटमुळं उफाळला नवा वाद!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold silver rates down worldwide india updates