#BoycottTakht : 'हिंदू टेररिस्ट' ट्विटमुळे उफाळला नवा वाद; लेखकाला...

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 February 2020

या चित्रपटाला करिना कपूर-खान, रणवीर सिंग, विकी कौशल, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर अशी जोरदार स्टारकास्ट लाभली आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर 'तख्त' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात होण्याच्या अगोदरपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियातही या चित्रपटाची चर्चा वारंवार होत होती. आता ट्विटरवर या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, असा ट्रेण्ड सुरू झाला आहे. चित्रपटाचे कथा लेखक हुसेन हैदरी यांनी हिंदूंना दहशतवादी म्हटल्याने सोशल मीडियात या चित्रपटावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. 

- दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...

हुसेन हैदरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हे दोन शब्द जपून वापरा, शब्द महत्त्वाचे आहेत. हिंदू दहशतवादी.' हैदरी यांनी ट्विटरवर या आशयाचे ट्विट केल्यानंतर या चित्रपटाच्या पूर्ण टीमवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. वादग्रस्त ट्विट करणाऱ्या लेखकाला तख्त चित्रपटाच्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्याची मागणीही नेटकऱ्यांनी करण जोहरकडे केली आहे. #BoycottTakht असा ट्रेंड ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. 

- बॉलीवूडचा खलनायक डॅनी डँग्नोपाच्या नावाचा असा आहे किस्सा..

'तख्त'वर टीकेची झोड उठवताना नेटकऱ्यांनीही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. काहींनी तख्त टीमला 'बॉलिवूड टेररिस्ट' म्हटले आहे. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरायला लागल्यावर हुसेन यांनी आपले ट्विटर अकाउंट खासगी ठेवले आहे. त्यामुळे आता त्यांचे ट्विट त्यांच्या परवानगीशिवाय पाहता येऊ शकत नाही. 

- शाहिद कपूरच्या 'या' सवयीमुळे लहानपणी त्याच्या आईला वाटत होती लाज..

या चित्रपटाला करिना कपूर-खान, रणवीर सिंग, विकी कौशल, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर अशी जोरदार स्टारकास्ट लाभली आहे. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott Takht trend after Scriptwriter Hussain Haidarys Tweet on Hindus goes viral