देवीच्या मंदिरात साडेचार कोटींचे दागिने, अडीच कोटींच्या नोटा

Visakhapatnam
Visakhapatnam

विशाखापट्टणम : नवरात्रीनिमित्त विशाखापट्टणममधील श्री कान्यका परमेश्वरी देवीच्या मंदिराला तब्बल साडेचार कोटी रुपयांचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांनी सजविण्यात आले होते. 

देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. विशाखापट्टणममधील हे देवीचे मंदिर अनोख्या पद्धतीने सजविण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरले आहे. या मंदिरातील सजावटीसंदर्भात देशभर चर्चा आहे. मंदीर समितीने तब्बल 4.50 कोटी रुपयांच्या किंमतीचे 4 किलोचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांनी सजावट केली होती. 

नव्या नोटांनी हे मंदीर सजविण्यात आल्याने श्री कन्यका परमेश्वरी मंदिरात भक्तांकडून गर्दी करण्यात येत आहे. मंदिरातील देवीच्या प्रतिमेला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे. प्रत्येक वर्ष नवरात्रोत्सवात देवीच्या प्रतिमेचा विशेष असा श्रृंगार केला जातो. देवीचे हे मंदिर जवळपास 130 वर्ष जुने आहे. दसऱ्याला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com