सुवर्णमहोत्सवी अधिवेशन नव्या संसदेत - ओम बिर्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 डिसेंबर 2019

वाटचाल ‘पेपरलेस’च्या दिशेने
लोकप्रतिनिधींनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे सोशल मीडियाद्वारेदेखील मतदारसंघांपर्यंत पोचविता यावेत यासाठी ३७०० व्हिडिओ क्‍लिप ई-मेल आणि व्हॉट्‌सॲपद्वारे खासदारांना पाठविण्यात आल्याचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले. अर्थात, लोकसभेचे कामकाज पूर्णपणे पेपरलेस झालेले नाही. मात्र नवे संसद भवन बनल्यानंतर ते पूर्णपणे डिजिटल असावे यासाठी प्रयत्न असेल. पेपरलेस कारभाराच्या प्रयत्नांना बहुतांश खासदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचेही लोकसभाध्यक्ष बिर्ला आवर्जुन म्हणाले.

नवी दिल्ली - नवे संसद भवन उभारणीची प्रक्रिया सुरू असून, २०२२ पर्यंत स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात संसदेचे अधिवेशन नव्या संसद भवनात चालवावे असा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओम बिर्ला म्हणाले, की २०२२ हे स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात संसदेचे अधिवेशन नव्या संसद भवनात चालवावे असा प्रयत्न असेल. नव्या संसद भवनाच्या प्रस्तावित स्थानाबाबत दोन ते तीन पर्यायांची चाचपणी सुरू आहे. 

अविवाहित जोडप्याने हॉटेलात एकत्र राहणे गुन्हा नाही

यानंतर बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशनाबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, या अधिवेशनात ज्वलंत मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे अल्पकालावधीचे अधिवेशन असूनही १३० तास कामकाज चालले आणि अधिवेशनाची उत्पादकता ११५ टक्के राहिली. अधिवेशनात १८ विधेयके मांडण्यात आली; तर १३ विधेयके लोकसभेत संमत केली. प्रश्‍नांच्या यादीतील संपूर्ण २० प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणण्यात यंदा प्रथमच यश आले. अधिकाधिक प्रश्‍नांवर चर्चा व्हावी, हा प्रयत्न होता. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रयत्न होता. सर्व पक्षांचे आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Jubilee Convention in New Parliament om birla