Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Sidhu Moose Wala: पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फ ​​राणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी ब्रारचा हात होता. खुनापासून सुरू झालेली गुन्ह्यांची ही मालिका अजूनही सुरूच आहे.
Goldy Brar Shot Dead In USA
Goldy Brar Shot Dead In USAEsakal

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रारची हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. (Goldy Brar Shot Dead In USA)

गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदरजीत सिंग आहे. पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात 1994 मध्ये त्याचा जन्म झाला होता. गोल्डी ब्रारचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त उपनिरीक्षक आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत आहे. मात्र, याआधीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत.

चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. पंजाब युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नेते गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्र फेज-1 येथे असलेल्या क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Goldy Brar Shot Dead In USA
गर्भ लिंग निदान चाचण्यांवरील बंदीमुळे स्त्री भ्रूणहत्या थांबू शकते, परंतू... IMA अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळचा होते. गुरलाल ब्रार याच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, आता नवे युद्ध सुरू झाले आहे.

दरम्यान, गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होती. मात्र गुरलालच्या हत्येनंतर तो गुन्हेगारीच्या क्षेत्रात बुडाला. कॅनडातूनच गोल्डीने खुनाचा कट रचायला सुरुवात केली आणि त्याच्या गुंडांनी अनेक घटना घडवून आणल्या.

यातील एक घटना म्हणजे गुरलाल सिंग यांची हत्या. 18 फेब्रुवारी 2021 रोजी पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोल्डी ब्रारने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी युवक काँग्रेस नेत्याची हत्या केली होती.

Goldy Brar Shot Dead In USA
Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार याने घेतली होती.

गोल्डीने हत्येचे कारणही सांगितले होते. गोल्डीच्या म्हणण्यानुसार, मोहालीतील मिड्डूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता. नंतर मूसवालाने त्याच्या व्यवस्थापकाला मदत केली. या शत्रुत्वामुळे लॉरेन्स टोळीने मूसवाला यांची हत्या केली.

पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फ ​​राणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी ब्रारचा हात होता. खुनापासून सुरू झालेली गुन्ह्यांची ही मालिका अजूनही सुरूच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com