गोळवलकर यांचे विचार योग्यरीत्या समोर आणण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आणि विचारवंत माधव सदाशिव गोळवलकर यांनी राष्ट्रवादाबद्दल मांडलेल्या विचारांविषयी अनेक गैरसमज असून, हे विचार योग्य दृष्टिकोनातून समोर ठेवण्याची गरज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एचआरडी) एका समितीने व्यक्त केली आहे.

तत्त्वज्ञानविषयक संशोधनास प्रोत्साहन मिळावे या हेतूने एचआरडीने इंडियन कैन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च (आयसीपीआर) या परिषदेची स्थापना केली असून, गोळवलकर यांनी राष्ट्रवादाबद्दल मांडलेल्या विचारांबद्दल त्यांच्या विरोधकांकडून अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याचा दावा या समितीने केला आहे. त्यांच्या विचारांची निंदानालस्ती केली असून, हे विचार योग्य दृष्टिकोन समोर ठेवून पुढे आणण्याची गरज परिषदेने व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "ज्योतिपुंज' या पुस्तकात गोळवलकर यांचा उल्लेख "पुजनिय गुरुजी' असा केला आहे. त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या 16 व्यक्तींच्या जीवनकथांचा या पुस्तकात समावेश आहे.

परिसंवादाचे आयोजन
गोळवलकर यांच्या विचारांमधील "राष्ट्र आणि राष्ट्रवादाची संकल्पना' या विषयावर पुढील महिन्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना केले आहे. त्यासाठी 27 जुलैपर्यंत नोंदणी होणार असून, त्यानंतर परिसंवादाची तारीख निश्‍चित करण्यात येणार आहे.

Web Title: golwalkar news marathi news sakal news