स्पर्धा परीक्षेसंदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 19 August 2020

रेल्वे (railway exam) , स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC (Staff Selection Commission) आणि बँकिंगसाठी (banking exam) एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

देशात कोरोनामुळे सध्या सर्व परीक्षा (competitive exams) रद्द झाल्या आहेत. शेवटच्या वर्षातील विध्यार्थ्यांना परीक्षांची चिंता असतानाच आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे (railway exam) , स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC (Staff Selection Commission) आणि बँकिंगसाठी (banking exam) एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया

यासंदर्भात आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठक होणार असून संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.  जर हा प्रस्ताव मंजुर झाला तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी खूप फायदा होऊ शकतो. सध्या या परीक्षा वेगळ्या होतात. रेल्वे,  स्टाफ सिलेक्शन , आणि  बँकिंगच्या परीक्षा बऱ्याचदा एकाच दिवशी   येतात, त्यामुळे  विद्यार्थांना अर्ज करुनही एकाच परीक्षेला बसण्याची वेळ येते. एकाच परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील परीक्षा देणे शक्य झाल्यास विद्यार्थांना याचा मोठा फायदा होईल. 

भारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी

आता रेल्वेनेही मोठी भरती काढली आहे. पुढील काही महिन्यांत रेल्वेत लाखांवर जागा भरल्या जाणार आहेत. सध्या नॉर्थइस्ट फ्रंटीयर (northeast frontier railway) मध्ये  4499 जागांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. आता यासाठी अर्ज मागवले आहेत. कालच्या 16 ऑगस्ट पासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  या भरतीसाठीची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे आहे. तसेच अर्ज दाखल करणारा उमेदवार दहावीची परीक्षा 59 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला असल्याची अट आहे. उमेदवाराने ITI उत्तीर्ण असावे, अशी अट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for competitive exam aspirants