esakal | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीपूर्वीच मोदी सरकारचे गिफ्ट?
sakal

बोलून बातमी शोधा

government employee

दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे रोजगार गमवावा लागलेल्या, तसेच वेतन कपात सहन कराव्या लागलेल्या वेतनधारी कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारकडून वेतनधारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट मिळणार आहे. यासाठी केवळ वित्त मंत्रालयाची मंजुरी हा केवळ औपचारिकतेचा भाग आहे.

दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम

सूत्रांच्या माहितीनुसार, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावास आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. वित्त मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय ईपीएफओ व्याज दर सदस्यांच्या खात्यावर जमा करू शकत नाही. एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने माहिती दिली की, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई दिलासा वाढ देण्यात येणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ईपीएफचे व्याजही जमा होणार आहे. वेतनधारी लोकांचा सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वित्त वर्ष २०२१ चे कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) व्याज येणाऱ्या दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे.

हेही वाचा: ऑगस्टमध्ये महागाई दरात वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी

2,18,200 रुपये मिळणार?

कोरोनाच्या काळात सुमारे दीड वर्षांपासून केंद्राने कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने दिला जाणारा महागाई भत्ता बंद केला होता. तज्ज्ञांच्या मते, लेव्हल 1 कर्मचाऱ्यांच्या डीएची थकबाकी 11,880 रुपयांपासून 37,554 रूपयांपर्यंत आहे. सोबतच लेव्हल- 14 (पे-स्केल) कर्मचाऱ्यांना डीए 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळणार आहे.

हेही वाचा: गुजरातनंतर आणखी एका राज्यात भाजप मुख्यमंत्री बदलणार?

loading image
go to top