कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे 12 डबे उलटले, रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान I Etawah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway

कोळशाच्या तुटवड्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचं संकट निर्माण झालंय.

कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे 12 डबे उलटले, रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान

कोळशाच्या तुटवड्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचं संकट निर्माण झालंय. एकीकडं औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत असताना दुसरीकडं मालगाडीचे 12 डबे उलटले आहेत. इटावा जिल्ह्यात (Etawah District) हा अपघात झाला आहे.

कोळशानं भरलेली मालगाडी कानपूरहून (Kanpur) गाझियाबादच्या (Ghaziabad) दिशेनं कोळसा घेऊन जात होती. या मालगाडीचे सुमारे 12 डबे इटावा जिल्ह्यातील फ्रेट कॉरिडॉरवर रुळावरून घसरले असून हे डबे कोळशानं भरलेले होते. सुमारे डझनभर डबे उलटल्यानंतर कोळसा सर्वत्र पसरला होता. यात रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालंय. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. हा अपघात OHE पोल 615/21 ते 615/27 दरम्यान रेल्वे स्थानकाजवळ झालाय.

हेही वाचा: 'मुस्लिमांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पेयांमध्ये असतात ड्रग्ज'

या अपघातात दोन खांबही तुटून पडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, कोळशाचे डबे मधूनच तुटले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण सत्यपाल सिंह यांनी सांगितलं की, सुरक्षेसाठी पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या रेल्वेचे डबे हटवण्याचे काम सुरुय. या अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलीय.

Web Title: Goods Train Derail Coal Rakes Etawah Front Corridor Kanpur Ghaziabad Rail Route Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradeshghaziabad
go to top