संस्कृत आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google translate

संस्कृत आता गुगल ट्रान्स्लेटवर उपलब्ध, कोंकणी भाषेचाही समावेश

गुगल ट्रान्सलेटमुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधण्याचा अडसर दूर झालाय. मात्र आता गुगलने जगभरातील आणखी २४ भाषांचा समावेश गुगल ट्रान्स्लेशनमध्ये केलाय. यात आता भारतातील सर्वाधिक प्राचीन मानली जाणाऱ्या संस्कृत भाषेचाही समावेश करण्यात आलाय. भारतातील ८ भाषा नव्याने समाविष्ट करण्यात आल्यात. यात महाराष्ट्रातील कोंकणी भाषेचाही समावेश आहे. तर उत्तर भारतातील भोजपूरी भाषेचाही समावेश करण्यात आलाय.

(Google added Sanskrit Language in google translation)

हेही वाचा: उड्डाण घेताच विमानाने पेट घेतला, आगीच्या भडक्याने २५ जण जखमी

भारतात २० हजारजण संस्कृत भाषेचा वापर करतात.ईशान्य भारतातील आसामी भाषा सुमारे २ कोटी ५० लाख जण बोलतात, त्याव्यतिरिक्त मिझो ८ लाख ८३ हजार जण बोलतात. तसंच कोंकणी भाषेचा नव्याने समावेश करण्यात आलाय, २० लाख नागरिक या भाषेचा वापर करत असल्याचं गुगलने म्हंटलंय. या भाषांचा समावेश करताना भाषा बोलणारे नागरिक, स्थानिक भाषांचे अभ्यासकांनी गुगलला यासंदर्भात मदत केली. तसंच गुगल ट्रान्सलेट वापर आणखी सहज करण्यासाठी देखील गुगलने प्रयत्न केलेत.

गुगल ट्रान्सलेटवर आता एकूण १९ भाषा उपलब्ध आहेत, संस्कृत भाषा गुगल ट्रान्स्लेशन मध्ये समाविष्ट करावी यासाठी सगळ्यात जास्त मागणी होती, असं गुगलच्या संशोधन टिमचे आयझॅक कॅझवेल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला लांगितलंय. संस्कृत व्यतिरिक्त कोंकणी, डोंगरी, मिझो, मणिपूरी (मेटेलियन), आसामी ,भोजपूरी,मैथिली या भाषांचा समावेस करण्यात आलाय. जगातील कूण १३३ भाषा गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध आहेत.

Web Title: Google Added Sanskrit In Google Translation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Google
go to top