गुगल बंद करु शकतं तुमचं जी मेल अकाऊंट ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

गुगल कोणत्याही युजरचा कंटेट हटवण्यापूर्वी याची माहितीही देईल.

नवी दिल्ली- जर तुमचे गुगलवर अकाऊंट असेल तर सावध व्हा. गुगल 1 जून 2021 पासून नवीन पॉलिसी लागू करणार आहे. नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर आपले अकाऊंट बंदही होऊ शकते. नवीन पॉलिसीनुसार जर युजर्सचे जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटो अकाऊंट दोन वर्षांपासून निष्क्रिय असेल तर गुगल या सर्व अकाऊंटवरुन आपला कंटेंट हटवेल आणि हे अकाऊंट बंद करेल. 

जर तुमचा जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटो अकाऊंटचा पुढे वापर करायचा असेल तर तुम्हाला त्या अकाऊंटवरील तुमची सक्रियता वाढवावी लागेल. 

हेही वाचा- Diwali 2020: दिपोत्सवाने अयोध्या उजळली; गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रिकॉर्ड नोंद

गुगल कोणत्याही युजरचा कंटेट हटवण्यापूर्वी याची माहितीही देईल. गुगलच्या नव्या पॉलिसीनुसार जर तुमचे अकाऊंट 2 वर्षांपासून आपल्या स्टोरेज लिमिटपेक्षा जास्त असेल तर गुगल कंटेंट जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोवरुन हटवू शकतो. परंतु, गुगलने कंटेट हटवण्यापूर्वी युजर्सला याची माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा- दहा वर्षांपासून भीक मागणारा निघाला DSP च्या बॅचचा पोलिस अधिकारी

जर तुमचे अकाऊंट बंद होण्यापासून रोखायचे असेल तर तुम्हाला वेळोवेळी अकाऊंटला ओपन करुन ते अपडेट करत राहिले पाहिजे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google can close your Gmail account Know what you need to do to