'सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया'वर गुगलने बनवला डुडल; जाणून घ्या त्यांच्या कार्याबद्दल

Google Doodle On Udupi Ramachandra Rao
Google Doodle On Udupi Ramachandra Rao

नवी दिल्ली- Google Doodle On Udupi Ramachandra Rao- भारताच्या सॅटेलाईट कार्यक्रमाला नवी दिशा देणारे डॉक्टर उड्डपी रामचंद्र यांचा आज 89 वा जन्मदिवस. या खास क्षणी गुगलने डुडल बनवून  (Udupi Ramachandra Rao Google Doodle) त्यांचा सन्मान केला आहे. त्यांना त्यांच्या खास सॅटेलाईट कार्यक्रमासाठी 'सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया' म्हटलं जातं. त्यांच्या नेतृत्वात भारताने 1975 मध्ये पहिला उपग्रह आर्यभट्टचे अवकाशात प्रक्षेपण केले होते. भारतीय अवकाश विज्ञानाला इतक्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये प्रोफेसर उड्डणी रामचंद्र राव यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा जन्म कर्नाटकमधील उड्डपी गावी  1932 मध्ये झाला होता. आपली डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते. त्यांनी नासामध्येही काम केले आहे. 

उड्डपी रामचंद्र राव (Prof. Udupi Ramachandra Rao)  यांनी पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हीकलसाठी रॉकेट तंत्रज्ञानाचा विकास केला होता. याच्या माध्यमातून जवळपास 250 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 2013 मध्ये पीएसएलव्हीच्या माध्यमातूनच भारताने मंगळयान उपग्रह लॉन्च केला होता. एका साधारण कुटुंबातून आलेल्या उड्डपी रामचंद्र राव यांनी आपली प्रतिभा आणि कष्टामुळे सर्वश्रेष्ठ भारतीय वैज्ञानिकांच्या रांगेत जागा मिळवली आहे.  प्रोफेसर राव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष आणि भारताचे अवकाश सचिवही राहिले आहेत. 

पद्म भूषण आणि पद्म विभूषणसह अनेक पुरस्कार

प्रोफेसर राव यांच्या नेतृत्त्वात भारताने 1975 मध्ये पहिले भारतीय उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडले. शिवाय त्यांच्या नेतृत्त्वात 20 पेक्षा अधिक सॅटेलाईट डिझाइन आणि तयार करुन अवकाशात सोडण्यात आले. 2013 मध्ये सोसायटी ऑफ सॅटेलाईट प्रोफेशनल्स इंटरनेशनल्सने प्रोफेसर राव यांना 'सॅटेलाईट हॉल ऑफ फेम, वॉशिंग्टन'चा भाग बनवला होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय एस्ट्रोनॉटिकल फेडरेशननेही प्रतिष्ठित 'आयएएफ हॉल ऑफ फेम'मध्ये त्यांचा समावेश केला होता. 

अवकाश क्षेत्रातील प्रोफेसर राव यांच्या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना 1976 मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्म भूषण देऊन सन्मान केला होता. त्यानंतर 2017 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च सन्मान पद्म विभूषण त्यांना देण्यात आला.  24 जूले 2017 मध्ये वयाच्या 85 वर्षी प्रोफेसर राव यांचे निधन झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com