Google Lays Off
ESakal
देश
Google LayOff: टेक विश्व हादरलं! कोणतीही सूचना न देता गुगलनं अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, वेगळचं कारण समोर
Google Lay Off News: टीसीएसनंतर गुगलनेही मोठी कारवाई केली आहे. शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामुळे आता जागतिक टेक सेक्टरमध्ये पुन्हा छाटणीची लाट पसरली आहे.
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नंतर आता जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलनेही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या क्लाउड डिव्हिजनमधून सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा ते त्यांचे ऑपरेटिंग खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या रणनीतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ला अधिक महत्त्व देत आहे.

