खाण समस्यांची प्रभूंकडून दखल 

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली.
 

पणजी- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या बंद खाणींच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. गोव्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रभू यांची आज गोव्यात भेट घेऊन त्यांना खाणी लवकर सुरू करण्याची विनंती केली.

प्रभू यांनी नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाणी सुरू करण्यासाठी खाण व खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. त्याचा पाठपुरावा आता प्रभू यांना दिल्लीत करावा लागणार आहे.

खाणपट्ट्यांचे राज्य सरकारने दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारीला दिलेल्या निवाड्यानुसार रद्द केले आणि त्यामुळे गोव्यातील खाणींतील लोह खनिज उत्खनन 15 मार्चपासून बंद आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात लाखभर जण प्रत्यक्ष, तर तितकेच अप्रत्यक्षरीत्या खाण व्यवसायावर अवलंबून आहेत.

Web Title: Google suresh prabhu interferes mine Problems